पुजा चव्हान आत्महत्या प्रकरणांत नाव समोरे आलेले वनमंत्री संजय राठोड यांच्यावर अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठविला होता. मात्र आतापर्यंत त्यांनी तो स्विकारलेला नाही. तसेच संजय राठोड यांनी पोहरादेवी याठिकाणी केलेले शक्तीप्रदर्शन आणि आज कॅबीनेटमध्ये लावलेली हजेरी. यावतुन भाजपने आक्रमक पवित्रा घेत. राठोडांवर कारवाईची मागणी लाऊन धरली आहे. यातच निलेश राणे यांनी ऊद्धव ठाकरे यांना निशाना करत त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
पुजा चव्हान आत्महत्या प्रकरणांत सगळ्या बाजूने अडकलेले संजय राठोड कॅबीनेटमध्ये येतात. तरिदेखील मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांच्यात त्यांच्याबर कारवाई करण्याची हिम्मत आणि धाडस नाही. त्यामुळे स्वत:च्या भाषणात ऊद्धव ठाकरे यांनी “मी मर्द” आहे असे म्हणू नये, असे निलेश राणे यांनी ट्वीट करत मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. तसेच सरकार संजय राठोडला वाचवण्याचा प्रयत्न करते अाहे. असेसुद्धा त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
पुजा चव्हान या तरुणीच्या आत्महत्येनंतर व्हायरल झालेल्या अॉडिअो क्लीपमुळे संजय राठोड यांचे नाव पुढे आले. त्यानंतर तब्बल पंधरा दिवस संजय राठोड हे नॉट रीचेबल होते. पंधरा दिवसांनतर बंजारा समाजाचे श्रद्धास्थान मानल्या जाणार्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी याठिकाणी आपल्या हजारो समर्थकांसोबत ते महाराष्ट्रासमोर आले. कोरोनाचा वेग वाढत असतांना संजय राठोड यांच्या या कृतीने महाविकासआघाडी सरकारच्या अडचणीत अधिकच वाढ झाली.
भाजपच्या प्रदेश ऊपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी हे प्रकरण चांगलेच लाऊन धरले आहे. आज चित्रा वाघ यांनी पुजा चव्हानने जिथे आत्महत्या केली, त्याठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यानंतर पोलिस स्टेशन गाठत त्यांनी पोलिसांवर संताप व्यक्त केला. पोलिस राजकीय दबावात काम करत आहे. त्यामुळे पुणे पोलिसांकडून तपास काढुन घेण्यात यावा असे त्या यावेळी म्हणाल्या.