उध्दव ठाकरे आज सातारा, रत्नागिरी व पुणे जिल्ह्यांच्या दौऱ्यावर

14

मुख्यमंत्री रत्नागिरी व पुणे जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री कोयनेच्या पोफळी जलविद्युत प्रकल्पाची तसेच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नवीन मार्गिकेची पाहणी करतील.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांचा नियोजित दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे –

गुरूवार दि. १० डिसेंबर रोजी सकाळी ९.०५ वा. जुहू विमानतळ येथून हेलिकॉप्टरने कोयनानगर (ता.पाटण, जि. सातारा)कडे प्रयाण.

स. १०.०० वा. कोयनानगर हेलिपॅडवर आगमन व मोटारीने रत्नागिरी जिल्ह्यातील पोफळी जलविद्युत प्रकल्पाकडे प्रयाण.

स. १०.५० वा. पोफळी जलविद्युत प्रकल्प कोयना टप्पा ४ विद्युतगृहाची पाहणी.

स. ११.२० वा मोटारीने कोयना धरण (ता.पाटण, जि. सातारा)कडे प्रयाण.

दुपारी १२.०५ वा. कोयना धरण येथे आगमन व परिसराची पाहणी.

दु. १२. ४० वा कोयना विश्रामगृह येथे आगमन व राखीव.

दु.१.१० वा. मोटारीने कोयनानगर हेलिपॅडकडे प्रयाण व हेलिकॉप्टरने ओझर्डे (ता. मावळ, जि. पुणे) कडे प्रयाण.

दु.२.०० वा. ओझर्डे हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोगदा क्र. २ च्या प्रकल्पस्थळाकडे प्रयाण.

दु. २.२० वा. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली ते कुसगाव या दरम्यानच्या नवीन मार्गिकेच्या बांधकामाची पाहणी व त्यानंतर मोटारीने प्रकल्पाच्या कॅम्प ऑफिसकडे प्रयाण.

दु. २.५० वा. कॅम्प ऑफिस येथे आगमन व मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली-कुसगाव दरम्यानच्या नवीन बांधकामाचे सादरीकरण.

दु. ३.१५ वा. मोटारीने ओझर्डे (ता.मावळ, जि. पुणे) हेलिपॅडकडे प्रयाण.

दु. ३.३० वा. ओझर्डे हेलिपॅड येथे आगमन व हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण करतील.