उध्दव ठाकरे आज अमरावती, औरंगाबाद जिल्ह्यात; बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची पाहणी करणार

14

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या शनिवार 5 डिसेंबर 2020 रोजी हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत. या दौऱ्यात ते अमरावती आणि औरंगाबाद जिल्ह्यातील महामार्गाच्या कामांना प्रत्यक्ष भेटी देणार आहेत.

सकाळी 10.20 वाजता मुंबईहून विमानाने नागपूर विमानतळ येथे आगमन. हेलिकॉप्टरमधून अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खांदेश्वर येथील शिवणी रसुलापूर , मौजे देऊळगव्हाण हेलिपॅड येथे प्रयाण. 11.15 वाजता मोटारीने हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी व राखीव.

 दुपारी 12.15 वाजता हेलिकॉप्टरने औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील मौजे गोळवडीकडे प्रयाण. 2 वाजता गोळवडी हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी व राखीव. दुपारी 3.10 वाजता हेलिकॉप्टरने औरंगाबादकडे प्रयाण. औरंगाबाद येथे आगमन व 3.35 वाजता विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण.