“ऊद्धव ठाकरेंची खरी जागा लोकसभेत, त्यांनी लकसभेत जावं” मुनगंटीवारांच अजब वक्तव्य!

10

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तीसरा दिवस सत्ताधारी आणि विरोधकांच्या खडाजंगीत पार पडला. राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलतांना मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांनी केंद्र सराकरवर निशाना साधला. तसेच माजी अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवारांनासुद्धा टोला लगावला. सुधिर मुनगंटीवारांचे सभागृहातील बोलणे बघून मला नटसम्राटाची आठवण झाली. अशाप्रकारे मुख्यमंत्र्यांनी मुनगंटीवार यांची खिल्ली ऊडवली. मात्र त्यानंतर सुधिर मुनगंटीवार यांनीसुद्धा मुख्यमंत्र्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

ऊद्धव ठाकरेंचे सभागृहातील भाषण हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे भाषण नसून ते शिवसेनाप्रमुख ऊद्धव ठाजरे यांचे भाषण होते असे मुनगंटीवार म्हणाले. आम्ही राज्यातील विविध प्रश्न याठिकाणी ऊपस्थित केले. मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नावर ऊत्तरे देणं अपेक्षित होते. परंतू त्यांना राष्ट्रीय मुद्द्यांमध्ये जास्त रस दिसतो. त्यामुळे त्यांची खरी जागा ही लोकसभेत आहे आणि त्यांच हे मुख्यमंत्रीपद जावं आणि त्यांनी लाकसभेत जावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो असे ते यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांना दिल्लीतील शेतकरी, चीन सिमा या विषयांवर बोलण्यातच त्यांचा रस असल्याचे जाणवले. पण महाराष्ट्रात आम्ही विविध मुद्दे ऊपस्थित केले. त्यावर मात्र मुख्यमंत्री काहीही बोलायला तयार नाहीत. महिलांवरील वाढते अत्याचार आहेत, शेतकर्‍यांचे प्रश्न आहेत, वीजबिलांबाबत प्रचंड गोंधळ आहे, वैधानिक विकास मंडळाबाबत ठाम भूमिका नाही असे अनेक प्रश्न आहेत. पंरतू मुख्यमंत्र्यांना यापैकी एकावरही भाष्य केलेले नाही.

राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलतांना ऊद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर प्रचंड टीका केली. दिल्लीतील शेतकरी आंदोलन, चिन सिमाप्रश्न तसेच हिंदुत्वावाद या भुमिकांवरुन त्यांनी केंद्रबसरकारवर निशाना साधला.