उद्धव ठाकरेंची कडक कारवाई; ‘या’ शिवसेना नेत्यांची पक्षातून कायमची हकालपट्टी

456

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार महेश कोठे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी केल्याची माहिती, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी दिली. कोठे यांनी शिवसेनेचा विश्वासघात केला असल्याने ही हकालपट्टी झाल्याचं बोललं जातंय.

महेश कोठे हे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. मात्र महाविकास आघाडीत कुरबूर नको म्हणून त्यांचा प्रवेश लांबणीवर पडल्याचं वृत्त होतं. त्यानंतर लगेचच कोठे यांची हकालपट्टी केल्याची माहिती पुरुषोत्तम बरडे यांनी दिली. त्यामुळे आता कोठे यांची परिस्थिती ‘घर का ना घाट का’ अशी झाली आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. आणि त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष सहभागी आहेत. शिवसेनेचे नगरसेवक राष्ट्रवादीने फोडल्याने त्याचा वेगळा संदेश जनतेत जाईल. म्हणून नियोजित महेश कोठे यांचा राष्ट्रवादी पक्षप्रवेश लांबणीवर टाकण्यात आल्याची माहिती आहे. त्यांना राष्ट्रवादी कधी प्रवेश देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.