अन ‘या’ ग्लो साइन बोर्डमुळे वाढली चंद्रपूर शहराची शोभा

8

पुणे, मुंबईत मोठ्या पदांवर नोकरीवर असलेले घरी परतले. त्यातून दुरावलेले मित्र एकत्र आले. त्यांनी एकत्र येत नमस्ते चांदा क्लब स्थापन केला.आजकालच्या ट्रेंडप्रमाणे चंद्रपूर शहरात प्रवेश करताना शहराची ओळख करवून देणारे ‘आय लव्ह चंद्रपूर’ मजकुराचा ग्लो साइन बोर्डच नव्हता. ही बाब लक्षात येताच हा बोर्ड लावण्याची मागणी काही दिवसांआधी नमस्ते चांदा फाउंडेशनने केली होती. खासदार बाळू धानोरकर यांनी त्याची तत्काळ दखल घेतली आणि ग्लो साईन बोर्ड लागला.

नमस्ते चांदा फाउंडेशनच्या मागणीनंतर खासदार धानोरकर यांनी पाठपुरावा करून काही दिवसांतच ही मागणी पूर्ण केली. त्यामुळे येथील युवकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. कोरोना विषाणूने लॉकडाऊन लागले. यामुळे अनेकांनी घरची वाट धरली.

ताडोबा राष्ट्रीय उद्यान, मोठे उद्योग, अनेक महत्वाची ठिकाणे आणि वारसा या शहराला लाभला आहे. त्यामुळे या शहराची ओळख नवीन पिढीला होण्याकरिता नमस्ते चांदा फाउंडेशनने खासदार बाळू धानोरकर यांच्याकडे इतरही मागण्या केल्या आहेत. त्यांपैकी पडोली परिसरात भव्य प्रवेशद्वार लवकरच उभारण्यात येईल, अशी ग्वाही खासदार धानोरकर यांनी युवकांना दिली आहे.