काकांना फॉलो करतोय पुतण्या, राष्ट्रवादीचे रोहित पवार पहाटे ४ वाजता APMC मार्केटमध्ये

222

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या कामाच आवाका महाराष्ट्राला माहित आहे. अजितदादा कोणत्याही कार्यक्रमासाठी वेळेवर पोहोचतात. जलद काम करण्यात त्यांचा हातखंडा आहे. अजित पवारांच्या कामाची पद्धत त्यांचा पुतण्याने म्हणजेच रोहित पवार फॉलो करताना दिसत आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पहाटेच नवी मुंबई एमपीएमसी मार्केट गाठले. आमदार रोहित पवार हे भल्या पहाटे चार वाजता नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झाले. पहाटेच त्यांनी एपीएमसीमधील मार्केटचा दौरा केला आहे. त्यामुळे आता पुतण्या काकांच्या पावलावर पाऊल देतोय असच म्हणावं लागेल.

यावेळी रोहित पवार एपीएमसीमधील व्यापारी तसंच काही शेतकऱ्यांशी चर्चा करत एपीएमसीमधील यंत्रणा समजून घेतली. येणाऱ्या काळात येथील अडचणी अधिवेशनात मांडणार, असही त्यांनी यावेळी सांगितलं.