संपूर्ण भारतात कोरोनाची रुग्णसंख्या नवे ऊच्चांक गाठत आहे. यामध्ये महाराष्ट्र पुन्हा पहिल्या क्रमांकावर आहे. देशातील ५० टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आढळत आहेत. दरम्यान महाराष्ट्रात कोरोना लसींचा तुटवडा जाणवत असून केंद्राकडून लस पुरवठ्यात दिरंगाई होत असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. यावरच केंद्रिय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी स्पष्टीकरण दिले असून या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
महाराष्ट्रात केवळ तीन दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा शिल्लक असल्ताचे आरोग्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना म्हटले. शिवाय केंद्रकडून लस पाठवण्यास वेग देण्याची आवश्यकता असल्याचेसुद्धा ते म्हणाले आहे. यानंतर राज्यातील भाजपने त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली होती. आता केंद्रिय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.
महाराष्ट्र सरकारच्या बेजवाबदारपणामुळे केंद्र सरकारच्या कोरोना विरुद्धच्या लढ्याला सुरुंग लागल्याचा आरोप डॉ. हर्षवर्धन यांनी केला आहे. कोरोना लस पुरवठ्यावर नियमित लक्ष दिले जात आहे. राज्य सरकारांना याबाबत नियमित माहितीसुद्धा देण्यात येत आहे. तरिदेखील नागरिकांमध्ये भीती पसरविणे हे आकलनापलीकडले आहे. असे आरोग्यमंत्री म्हणाले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा राज्य सरकारमधील मंत्र्यांवर कडाडून टीका केली होती. लसीकरणा साठा कमी असल्यास केंद्र सरकारशी बोलण्याऐवजी प्रसारमाध्यमांशी का बोलताय असा सवाल त्यांनी ऊपस्थित केला होता. तर जेंद्र सरकार महाराष्ट्राच्या मागणिस प्रत्युत्तर देत नसल्यामुळे हतबल होऊन प्रसारमाध्यमांसमोर बोलल्याचे राजेश टोपे म्हणाले होते.