केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांचा ट्विटर वरील डीपी गायब

1

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ट्विटरच्या अकाउंटचा डीपी अचानक गायब झाला आहे. त्यांचा फोटो काही गेळासाठी गायब झाला होता. ANI या वृत्तसंस्थेने याबाबत ट्विट करून माहिती दिली होती. या फोटोवर अज्ञात व्यक्तीने कॉपीराईट अधिकार संगितला होता. यामुळे हा फोटो हटवण्यात आला होता अशी माहिती ANI ने केलेल्या ट्विटमधून उघड झाली आहे. मात्र आता हा फोटो पुन्हा रिस्टोर करण्यात आला आहे.

अमित शहा यांचा फोटो गायब झाल्यामुळे सोशल मिडियावर यावर चर्चा सुरू झाल्या आहेत. देशाच्या गृहमंत्र्याच्या फोटोवर कोण दावा करेल असा प्रश्न उपस्थित झाला आहे. देशाचे गृहमंत्री असलेले अमित शहा यांचे ट्विटरवर सर्वाधिक फॉलोवर्स आहेत. ते देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक फॉलोवर्स असलेले नेते आहेत. त्यांच्यापेक्षा जास्त फॉलोवर्स नरेंद्र मोदी यांचे आहेत. अमित शहांचे 23.6 मिलियन फॉलोवर्स आहेत. परंतु ते 296 लोकांना फॉलो करतात.