रस्ते बांधणी, पूल उभारणी तसेच सध्याच्या काही रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी सुप्रिया सुळे यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने निधी जाहिर केला आहे, असे सुळे यांनी म्हटले आहे.
इंदापूर तालुक्यातील वरकुटे खुर्द-वडापुरी-गलांडे वाडी नं. 2 या रस्त्यासाठी 4 कोटी 91 लाख 4 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती, इंदापूर, वेल्हा आणि पुरंदर तालुक्यातील विविध रस्त्यांची दुरुस्ती तसेच नव्याने रस्ते उभारणीसाठी केंद्र सरकारने सुमारे 25 कोटी निधी मंजूर केला आहे.
तसेच बारामती व इंदापूर तालुक्याला जोडणाऱ्या बारामती-जळोची-कण्हेरी-लाकडी-कळस-लोणी देवकर या रस्त्यासाठी 4 कोटी 91 लाख 48 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.