‘बिग बी’ झाले भावूक; KBC च्या सेटवर चाहत्याकडून अनोखी भेट

3

बॉलीवूडचा महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या अभिनयाची छाप सर्वत्र उमटवली आहे. अभिनयासोबत त्यांची स्टाईल आणि आवाजाचे लाखो चाहते आहेत. त्यांचे चाहते त्यांच्यासाठी काहिहि करायला तयार असतात. बिग बींसाठी पुष्पगुच्छ, चित्रे, स्केच, फोटो यासांरख्या अनेक गोष्टी त्यांना भेटवस्तू म्हणून मिळत असतात. बिग बींच्या अभिनयप्रवासाला नुकतीच 51 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने त्यांच्या चाहत्याने त्यांना केबीसीच्या सेटवर एक भेटवस्तू दिली. हे सरप्राईज पाहून बच्चन आनंदित होऊन सोशल मीडियावर गिफ्टचा फोटो व्हायरल केला आहे. या चाहत्याने कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर बिग बींची सुंदर रांगोळी काढली आहे. हे पाहून अमिताभ बच्चन सुद्धा थक्क झाले.

गिफ्टचा फोटो शेअर करत बिग बी म्हणाले, ‘हा फोटो नसून ही रांगोळी आहे. ज्यांनी ही रांगोळी रेखाटली त्यांनी माझा 51 वर्षाचा फिल्म इंडस्ट्रीतला प्रवास दाखवला आहे, मला 7 नोव्हेंम्बरला हि अनोखी भेट मिळाली आहे’ असे त्यांनी कॅपशनमध्ये लिहले आहे. या रांगोळीच्या खालच्या बाजूला 7 नोव्हेंम्बर 1969 ही तारीख लिहली असून ‘सात हिंदुस्थानी’ या पहिल्या चित्रपटाचा उल्लेख केला आहे. हि सुंदर भेट पाहून अमिताभ बच्चन भारावून गेले होते.

अमिताभ बच्चन यांच्या कामाविषयी बोलायचे तर ते सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. काही दिवसांत बच्चन आगामी चित्रपट ‘ब्रम्हस्त्र’, ‘झुंड’, ‘चेहरे’ या चित्रपटात झळकणार आहेत. पुढच्या काही दिवसांत बिग बी अजय देवगण दिग्दर्शित ‘मंडे’ या चित्रपटाच्या शूटिंगला हैद्राबादमध्ये सुरवात करणार आहेत.