राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालय ‘या’ दिवशी होणार सुरू; उदय सामंत

15

राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी महाविद्यालये सुरू करण्यासाठी कुलगुरूंची बैठक घेतल्यानंतर 1 फेब्रुवारीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कुलगुरू व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या यूजीसी कृती मानंकनाबाबत (स्टॅडर्डऑपरेटींग प्रोसिजर- एसओपी) चर्चा झाली, पण अद्याप निर्णय झालेला नाही.

कोरोनाच्या संकट आता टळत असल्या कारणाने शाळा देखील टप्प्याने सुरु करण्यात येत आहेत. मात्र राज्यातील विद्यापीठे कधी सुरु होणार असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. राज्यातील विद्यापीठे महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय अंतिम टप्यात असून SOP ठरवून टप्याटप्याने महाविद्यालय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

वसतिगृह सुरू करण्याबाबत सुद्धा चर्चा झाली आहे. कारण काही वसतिगृह अजूनही क्वॉरंटाईन सेंटर आहेत. ते सुद्धा टप्याटप्याने सुरू केले जाणार आहेत. आता मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली डिजास्टर मॅनेजमेन्टसोबत बैठक होईल आणि त्यानंतर तातडीने कॉलेज सुरू करण्याबबत निर्णय होईल. कॉलेज सुरू होण्याची तारीख 2 ते 4 दिवसात जाहीर करू, असे उदय सामंत यांनी सांगितले.