यूजीसीने दिला हिरवा कंदील, दिवाळीनंतर महाविद्यालये सुरू होणार…

3

दिवाळीनंतर देशातील सर्व महाविद्यालये सुरू करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्याचबरोबर काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याचबरोबर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मोबाईलमध्ये आरोग्य सेतू हे ऍप घेणं बंधनकारक आहे. पहिल्या टप्प्यात संशोधक, पद्युत्तर, पदवी, आणि अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू होणारा आहेत. असं यूजीसीने म्हटलं आहे.

विद्यार्थ्यांना स्वेच्छा उपस्थिती परवानगी देण्याबाबत यूजीसीने कळवल आहे. एकूण विद्यार्थी संख्येच्या ५०% विद्यार्थ्यांना महविद्यालयात प्रवेश देण्यात यावा. महाविद्यालय सुरू करण्यापूर्वी महविद्यालय निर्जंतकीकरण करावे. विद्यार्थी, कर्मचाऱ्यांना मास्क लावणे बंधनकारक आहे. प्रत्यक्षात महाविद्यालये सुरू झाले तरी विद्यापीठाने ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवावे. अशा सूचनाही यूजीसीने दिल्या आहेत.