“जोपर्यंत भाजपची जिरवत नाही, तोपर्यंत आम्ही एकत्र”

19

महाराष्ट्रातील सत्तेमध्ये समान किमान कार्यक्रमावर आम्ही एकत्र आलो आहोत. कुठेही आमच्यात मतभेद नाहीत आणि ते असण्याचे कारणही नाही. जोपर्यंत भाजपची जिरवत नाही, तोपर्यंत आम्ही एकत्र आहोत, असे काँग्रेस नेते आणि राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी वक्तव्य केलं आहे.

यूपीएचे नेतृत्व करण्यास सोनिया गांधी सक्षम आहेत, असेही त्यांनी सांगितले. ओबीसी जिल्हा मेळाव्यासाठी मंत्री विजय वडेट्टीवार काल नगरमध्ये आले होते. त्यावेळी ते माध्यमांनी बोलत होते.

भाजपला बहुजनांचे राजकारण संपवायचे आहे. आज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना इडीची नोटीस आली, उद्या मलाही येऊ शकते. बदल्याच्या राजकारणाचा पायंडा भाजपने पाडला आहे. मात्र, त्यांनी लक्षात ठेवावे की कोणीही सत्तेचा मुकुट घेऊन आलेला नाही. जे पेराल ते उगवेल आणि त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही विजय वडेट्टीवर यांनी दिला आहे.