पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीत भटक्या कुत्र्यावर अनैसर्गिक अत्याचार; ६५ वर्षीय व्यक्तीचा घृणास्पद प्रकार उजेडात

5

पुण्यातील मॉडेल कॉलनीत एक अत्यंत किसळवानी घटना घडली आहे. उच्चभ्रू सोसायटीमध्ये सुरक्षारक्षकाचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. भटक्या कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी ६५ वर्षीय सुरक्षारक्षकाला अटक केली आहे.

सदरील सुरक्षारक्षकावर अनैसर्गिक अत्याचार करणे, प्राण्यांशी क्रूरपणे वागणे यास प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑक्टोबर पासून सुरू असल्याचं कळतंय.

मॉडेल कॉलनीतील मिलेनियम सोसायटीत ६५ वर्षीय सुरक्षा रक्षक रात्रपाळीची ड्युटी करत असताना त्याने भटक्या कुत्र्याला पकडले. आणि त्यावर अत्याचार केला. हा प्रकार होत असताना सोसायटीतील तरुणीला जग आली. तिने सदरील प्रकार पाहिला. आणि प्राणीमित्रांना फोन करून प्रकरण कळवले.

त्यानंतर या तरूणाईने सुरक्षा रक्षकावर पाळत ठेवून पुन्हा अत्याचार करत असताना ४ एप्रिल रोजी मध्यरात्री पाहिले. तेव्हा त्या तरुणीने व्हिडिओ काढला. त्यानंतर रीतसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी विकृत सुरक्षा रक्षकास अटक केली आहे.