उर्मिला मातोंडकरच्या केंद्र सरकारवर खोचक टिका

8

राजधानी दिल्लीत काही महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. शेतकरी आंदोलनावरुन देशात गदारोळ निर्माण झाला आहे. शेतकरी आंदोलनावर जगभरातील सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया दिल्यानंतर जो प्रकार आपल्या देशातील सेलिब्रेटिंनी केला. त्याच्यावर प्रसिद्ध अभिनेत्री आणि शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी टीका केली आहे.

यावेळी तिने शेतकऱ्याच्या बाजूने भूमिका मांडत केंद्राच्या कारभारावर टीका केली आहे. तसेच फडणवीसांनीही विचारपूर्वक बोलावं असा सल्लाही तिने यावेळी दिला आहे. एका मुलाखतीत उर्मिलाने केंद्र सरकारला विरोध करत, शेतकरी आंदोलन नक्कीच भारताचा मुद्दा आहे आणि तो आपणच सोडवला पाहिजे. प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असतात. त्य़ामुळे प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे असे सांगितले.

त्याचप्रमाणे शरजीलच्या विधानाचाही तिने तीव्र शब्दात निषेध केला आहे. यावर बोलताना तिने, शरजीलनं केलेल्या विधानाचा निषेधच आहे, कुठल्याही धर्माचा अपमान करण चुकीचं आहे. मी त्याच्या विधानाचा जाहीर निषेधच करणेनं. कारण आपल्या देश सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे. त्यामुळे कोणत्याही धर्माच्या, जतीच्या व्यक्तीने कोणत्याही विषयावर बोलताना विचारपूर्वक बोलावे. असे ती म्हणाली.

त्यांनी आज देशभरात सेलिब्रेटी आणि खेळाडूंनी ट्विटवर जो ट्रेंड सुरु केला त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. उर्मिलाने याआधी शेतकरी आंदोलनाच्या समर्थानार्थ एक व्हिडिओ देखील ट्विट केला होता. उर्मिलाच्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती शेतकरी आंदोलनाच्या बाजुने बोलताना सांगतो, आपल्यांसाठी लढलो तर योद्धा आणि इंग्रजांविरुद्ध लढलो तर देशभक्त. कोरोना काळात लोकांना जेवण वाटले, सुविधा उपलब्ध करुन दिल्या तर देशप्रेमी. परंतु आता आमचा अधिकार मागितला तर खलिस्तानवादी किंवा आतंकवादी. हा कोणता कायदा आहे.? त्यामुळे उर्मिलाही आता आंदोलक शेतकऱ्याच्या बाजूने उभी राहिली आहे.