प्रजासत्ताकदिनानिमित्त लाल किल्ल्यावरील राजपथावर निघालेल्यार परेडमध्ये ऊ.प्रदेशच्या भव्य राममंदिर निर्माणच्या मॉडेलने बाजी मारली आहे. केंद्रिय सुरक्षामंत्री राजनाथ सिंह यांच्यातर्फे दि.२७ जानेवारील दिल्ली याठिकाणी हा पुरस्कार देऊन ऊ.प्रदेश सरकारला सन्मानित करण्यात येणार आहे.
यावर्षिच्या परेडमध्ये ऊ.प्रदेशच्याबतीने आयोध्येत निर्मीती केली जात असणार्या भव्य राममंदिरच्या मॉडेलचे सादरीकरण केले गेले. अतिशय सुंदररित्या निर्माण करण्यात आलेल्या या मॉडलमुळे राजपथावरील परेडमध्ये ऊ.प्रदेशने पहिला क्रमांक पटकाविला आहे. ऊ. प्रदेशचे सुचना निदेशक शिशीर यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.
गेल्या वर्षी ऊ.प्रदेशने दुसरा क्रमांक मिळवला होता. मात्र यावर्षी पहिल्या क्रमांकावर त्यांनी आपले नाव कोरले आहे. याबद्दल सर्वस्तरातून हे मॉडल निर्माण करणार्यांचे कौतुक होते आहे. राजपथावर होणार्या परेडमध्ये सादर करण्यात आलेल्या या राममंदिरच्या वास्तूचे दर्शन संपूर्ण जगास झाले आहे. हे मॉडेल राजपथावर दाखल होताच ऊपस्थितांनी ऊभे राजत टाळ्यांच्या कडकडाटात या मॉडेलचे स्वागत केले.
जहां अयोध्या प्रभू श्रीराम की,
देती समता का संदेश,
कला और संस्कृती की धरती,
धन्य धन्य ऊ.प्रदेश
असे लिहीत ऊ.प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्वीट केले आहे.