केवळ लसीकरण हाच या आजारावरील कामयस्वरुपीचा उपाय : राहुल गांधी

11

कोरोना हा तोंड वर काढणारा आजार आहे, यावर लॉकडाऊन आणि मास्क हा तात्पुरता उपाय आहे. केवळ लसीकरण हाच या आजारावरील कामयस्वरुपीचा उपाय असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं.

गृहमंत्रालयाने 30 जून पर्यंत लॉकडाऊनबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावेत, असे सूचवले आहे. कोरोनाच्या या सर्व मुद्द्यांबाबत काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.

देशातील कोरोना मृत्यूदराची आकडेवारी खोटी असल्याचा आरोपही राहुल गांधींनी केला आहे. तसेच, सरकारने खरी आकडेवारी जनतेसमोर ठेवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज दुपारी 12.30 वाजता पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये, कोरोना, लॉकडाऊन, उपाययोजना आणि नागरिकांच्या समस्यांसंदर्भात भाष्य केले. यावेळी, केंद्र सरकार कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही राहुल यांनी केला.