पवारांच्या बारामतीत 16 तारखेपासून लसीकरणास सुरुवात

55

शनिवारी (दि. 16) पासून बारामतीत करोना लसीकरणास सुरूवात करण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. त्यामुळे बारामतीकरांसाठी ही गुडन्यूज ठरली आहे.

प्रत्येक दिवसाला 300 ते 400 जणांना कोरोनाची लस देण्यात येणार असून आठ ते दहा दिवसांच्या कालावधीत बारामतीमधील करोनाचा लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात येणार आहे.

बारामती तालुक्‍यातील 1 हजार 278 शासकीय आरोग्य कर्मचारी व खासगी वैद्यकीय क्षेत्रातील 2 हजार 200 आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोविड ऍपवर लसीकरणासाठी नोंदणी केली होती. या सर्व कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लसीकरण करण्यात येणार आहे.