‘लस उपलब्ध नसेल तर, १ मेपासून सुरू होणारी लसीकरण मोहीम राबवायची कशी – राजेश टोपे

15


राज्यात कोरोना रुग्ण वाढत असताना दुसरीकडे युद्ध पातळीवर लसीकरणाला सुरवात झालेली आहे. त्यात १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस टोचण्यात येणार आहे. मात्र सध्या राज्याकडे अत्यंत अल्पप्रमाणात लसीचा साथ उपलब्ध असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेली आहे. त्यामुळे राज्यांकडे उपलब्ध नसेल तर लसीकरण मोहीम राबवायची कशी, असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला.

सध्या राज्यात लसीकरण मोहीमेंतर्गत दीड कोटी लोकांना लस देण्यात आली असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. तसेच १ मेपासून सुरू होणाऱ्या लसीकरण मोहीमेसाठी लस उपलब्ध व्हावी यासाठी सिरम आणि भारत बायोटेक या दोन्ही लस उत्पादक संस्थेला पत्र लिहले असल्याचेही राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. तसेच १ मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरणाला सडे सात हजार कोटीचा खर्च येणार आहे, त्यामुळे मोफत लसीकरण करायचे की नाही या बाबत लवकरच राज्य सरकार निर्णय घेणार आहे.


तसेच राज्यातील आर्थिक दुर्लभ घटकांना लस मोफत देण्यासंदर्भात राज्य सरकार आग्रही आहे असेही त्यांनी यावेळी टोपे यांनी सांगितले. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करताना राज्याकडे लस उपलब्ध होणे हे एक मोठे आव्हान असल्याचे राजेश टोपे यांच्याकडून सांगण्यात आले. १८ ते ४४ या वयोगटातील ५ कोटी ७१ लाख नागरिक राज्यामध्ये असून, या सर्वांना लसीचे दोन डोस याप्रमाणे दिले गेले. तर, एकूण बारा कोटी लसीची राज्याला आवश्यकता लागेल, अशी माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली आहे.