पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी सांगितलं की, देशात कोरोना लस निर्मितीच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. युरोप आणि अमेरिकेनं महत्त्वाच्या अशा कच्च्या मालाच्या निर्यातीवर निर्बंध लादल्यानं लस निर्मितीत अडथळा येत आहे.
सीरम इन्स्टिट्यूट महिन्याला 6 ते 6.5 कोटी लशींचे डोस तयार करते. सीरम यावर्षी जून महिन्यापर्यंत 10 ते 11 कोटी लशींचे डोसची निर्मिती करण्यासाठी तयार आहे. असेही आदर पुनावाला म्हणाले.
अनेक राज्यांमध्ये रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसत आहे. यात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळत असून लशीचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे अनेक जिल्ह्यातील लसीकरण केंद्र बंद करण्यात आली आहेत. लशीच्या तुटवड्यावरून राजकारणही रंगलं आहे.
सरकारने दोन ते तीन महिन्याच्या कालावधीसाठी लशीची किंमत स्थिर ठेवण्यासाठी आणि भारतात पुरवठा करण्याबाबत सरकारची विनंती मान्य केली असल्याची माहिती पूनावाला यांनी दिली.