संपूर्ण देशात कोरोनाचा फैलाव वेगाने होतो आहे. सध्या देशात लसीकरणावर भर दिला जातो आहे. मात्र आता कोरोना प्रतिबंधात्मक लसींच्या तुटवड्याचा सामना आपल्याला करावा लागणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्रानंतर आता अोडिसामध्येसुद्धा कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे.
महाराष्ट्रामध्ये केवळ दीड दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा शिल्लक आहे. अोडिसामध्येसुद्धा हीच परिस्थिती आहे. अोडिसात दोन दिवस शिल्लक एवढा लसींचा साठा असून ७०० लसीकरण केंद्रावर लसीकरण ठप्प करण्यात आले आहे. अोडिसाचे आरोग्यमंत्री नब किशोर दास यांनी केंद्राला यांसंबद्धिचे पत्र पाठवले असून लसींच्या डोसची मागणी केली आहे.
अोडिसामध्ये दरदिवसाला अडीच लाख लसीचे डोस दिले जातात. आता ५.३४ लाख लसींचे डोस शिल्लक आहेत. केवळ दोन दिवस पुरेल एवढाच हा साठा आहे. त्यामुळे केंद्राने २५ लाख डोस अोडिसाला पाठवावी अशी मागणी करण्यात आली आहे. याअगोदरसुद्धा १५ लाख डोसची मागणी करण्यात अाली असतांना केंद्राकडून त्यांस अद्यापही ऊत्तर आलेले नाहीये, अशी माहिती दास यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातसुद्धा लसीकरणाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. महाराष्ट्राला लसीकरण पुरवण्याबाबत केंद्र सरकार दुजाभाव करीत आहे. महाराष्ट्राला केवळ साडेसात लाख डोसेस देण्यात आले आहेत, तर ईतर राज्यांना तुलनेने अधिक डोसेस दिले गेले असल्याचे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत.