औरंगाबाद महानगर पालिकेच्या वतीने शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. महानगर पालिकेच्या वतीने शहरात सर्व 115 वार्ड मध्ये 45 वर्ष पुढील सर्व नागकरिकांसाठी जम्बो कोविड प्रतिबंध लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे .या लसीकरण मोहिमेस नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
लसीकरणासाठा संपल्या मुळे लसीकरण मोहीम थांबेल का अशी शंका उपस्थीत झाली होती. या अनुषंगाने प्रशासक तथा आयुक्त श्री आस्तिक कुमार पांडेय यांच्या निर्देशानुसार मनपाच्या वतीने शासनाकडे कोवीशिल्ड व कोवॅक्सिंन लसींची मागणी करण्यात आली होती.
शासनाकडून मनपाला 25000 लसींचा साठा उपलब्ध झाला असून, उद्या पासून सर्व लसीकरण केंद्रावर लसीकरण पूर्वरत सुरू राहणार आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन मनपा प्रशासनाच्या वतीने उपायुक्त तथा टास्क फोर्स प्रमुख श्रीमती अपर्णा थेटे व आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ नीता पाडळकर यांनी केले आहे .