मेहकर प्रतिनिधी- विष्णु आखरे पाटील
केंद्र सरकारने पारित केलेले कृषी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी व २००६ साली कांग्रेस-राष्ट्रवादी सरकारने आणलेले कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये व प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांच्या मार्गदर्शनात,जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांच्या नेतृत्वात मेहकर उपविभागीय कार्यालया समोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी ‘वंचित बहुजन आघाडीचे नेते वसंतराव वानखेडे,डाॅ.राहुल दाभाडे, सिद्धार्थ अवसरमोल, बाळु चव्हाण, दिपक पाडमुख, अॅड. बबन वानखेडे, प्रदीप सरदार, शालीकराम अंभोरे, भिमराव मोरे, रमेश मोरे, दिलीप पगारे, तेजराव अवसरमोल, संजय अवसरमोल, किशोर अवसरमोल आदि उपस्थित होते.
त्याच बरोबर विजय जाधव, दिलीप अवसरमोल, पृथ्वीराज अवसरमोल, जिवन वानखेडे, गणेश खंडागळे,अनिल देबाजे, रोहित झरे, रोशन तुरुकमाने, विकी ईंगळे, सदानंद मोरे, सचिन अंभोरे, आशिष पैठणे, विनोद जाधव, राजु गवई, संजय शेजुळ, पंजाब अंभोरे, सुनिल ब्रम्हपुरीकर यांच्यासह अनेक शेतकरी व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.