लासुर स्टेशन प्रतिनिधी संजय शर्मा
दि.18/03/2021 आज वंचित बहुजन आघाडी च्या वतिने सावंगी ग्रुप ग्राम पंचायत लासुर स्टे. चे ग्रामसेवक यांना नागरी समस्या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे या मध्ये 1)रमाई आवास घरकूल योजनेचा निधी,व घरकूल योजनेची 100%अमंलबजावणी करणे. 2)अपंगासाठी राखीव आसलेला निधी तात्काळ वाटप करणे. 3)दलित वस्ती सूधार योजनेचा निधी 100%दलित वस्तीवरचं खर्च करूण विकास कामे करणे. 4)लासूर स्टेशन येथील कायमस्वरूपी आसणारा पिण्याचा पाण्याचा प्रश्न निकाली काढणे.सर्वांना मूबलक पाणी पूरवण्याचे व्यवस्थापण करणे 5)ग्रामपंचायतीकडून लासूर स्टेशनचा वाढता लोकसंख्येचा विस्तार बघता स्वंतत्र शौचालय ‘पे अँड यूज’ या तत्वावर सार्वजनिक शौचालय चार ठिकाणी बनविणे. 6)ग्रामपंचायतीकडून विविध पूरविल्या जाणा-या सोईसूविधा आणी त्यांची फिस ही दर्शनी भागात लावणे.
या प्रसंगी भरतकुमार पाटणी,संदिप गायकवाड,सपना गायकवाड,संदिप आमराव,संतोष बागुल,कल्पेश गायकवाड, शरद पगारे,अजिज पठाण,विलास ञिभुवन,मयुर शिरसाठ. ग्रामपंचायत सदस्य अमोल शिरसाठ,प्रकाश कोकरे ,कल्याण पवार, संजय पांडव ,अशोक सौदागर,भगवान गाढे,वसिम मन्सुरी उपस्थित होते.