ज्येष्ठ विचारवंत मा.गो.वैद्य यांचे वृद्धापकाळाने निधन

13

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते आणि पत्रकार मा. गो. वैद्य यांचं निधन झाले आहे. वयाच्या ९७ व्या वर्षी ते काळाच्या पडद्याआड गेले आहेत. यांचे वृद्धापकालीन आजारामुळे निधन झाले. मागील दोन दिवसांपासून त्यांना अशक्तपणा जाणवत असल्याने धंतोली येथील स्पंदन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. काल दुपारी 3.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

संघाचे मुखपत्र असलेल्या ‘तरुण भारत’ या दैनिकाचे ते खूप वर्ष संपादक होते. देशभरातल्या अनेक वृत्तपत्रांमध्येही त्यांनी लिखाण केले होते. दैनिक तरुण भारतमध्ये त्यांनी अनेक वर्ष लिहिलेलं ‘भाष्य’ हे सदर चांगलच गाजलेले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबद्दल ट्विट करुन माहिती दिली आहे आहे. मा. गो. वैद्य यांच्या पश्चात त्यांची पत्नी सुनंदा, तीन मुली, पाच मुलं असं कुटुंब आहे. रविवारी (20 डिसेंबर) सकाळी अंबाझरी घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होत आहेत.