कधी कधी असं वाटतं. प्रेमकहाणी कथानक असलेले चित्रपट बनवावेत ते फक्त दक्षिणेने. बाकीच्यांना त्यांच्या जवळपास सुद्धा जाता येत नाही. किंवा त्यांचा आयशस्वी प्रयत्न केविलवाणा वाटतो असो.
साऊथ चे चित्रपट म्हणजे फक्त मारधाड असा गैरसमज सगळीकडे पसरलाय. मात्र दाक्षिणात्य सिनेमे इतकी तरल प्रेमकथा पडद्यावर साकारू शकतात. हे सगळ्यांना अशक्यप्राय वाटायचं. पण “96” ने हे सगळे भ्रम तोडले. कुठल्याही प्रादेशिक भाषेत इतकी सुंदर लव्हस्टोरी असलेला कदाचित हा एकमेव चित्रपट आहे. असं मी म्हणेन.
बळजबरी घुसाडलेले प्रणयदृष्य, रिकामा इमोशनल ड्रामा, कल्पनेचे इमले इत्यादी व्यतिरिक्त हा सिनेमा आहे. प्रत्येक दृश्यात वेगळेपण आहे. शाळेपासून ते अविवाहित असण्यापर्यांत हे कथानक मनाचा ठाव घेतं. सरळ, साधं, सुंदर कथानक फुलवलं आहे.
आजूबाजूला व्यवधान असतांना हा सिनेमा पाहण्यासारखा नाही. शांतपणे, एकांतात आस्वाद घेण्याची ही कलाकृती आहे. विजय सेतुपती आणि त्रिषाची ही केमिस्ट्री वाखाणण्याजोगी आहे. 2018 चा फिल्मफेअर या चित्रपटाला मिळालाय. हा सिनेमा बघणं म्हणजे निव्वळ सुख मिळवणं. उशीर कशाला करताय. हिंदी डब मूव्ही यू ट्यूब वर उपलब्ध आहे. नक्की बघाच…
Rohit Giri…✍️