विनायक राऊतांचा नारायण राणेंवर जहरी वार

48

खासदार विनायक राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना नारायण राणेंवर जोरदार टीका केली.तसेचसिंधुदुर्ग भवन कसं बनलं, कोकणवासीयांना फसवून भूखंड कसं लाटला हे आम्ही लोकांना सांगणार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला.

भाजपनं पनवती म्हणून राणेंना अडगळीत टाकलेले आहे. त्यांना कावीळ झालेली आहे. ते अजून कोकणातही गेलेले नाहीत. भ्रष्टाचाराचा महामेरू म्हणून राणेंचा उल्लेख होतो. अशी जहरी टीका विनायक राऊत यांनी केली आहे.

राणेंनी इतरांना सल्ला देऊ नये. आधी स्वत:च्या घरात शांती घालावी. वर्षा व मातोश्री ही दैवतांची घरे आहेत. त्यावर बोलणं त्यांना शोभत नाही, असा पलटवारही त्यांनी केला. 

आघाडी सरकार स्थिर आणि भक्कम आहे. हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल. कुठलीही समस्या असली तरी त्यातून मार्ग काढला जाईल, असं त्यांनी सांगितलं.