कुंभ मेळ्यामध्ये मात्र नियमांचे उल्लंघन होत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाचे प्रोटोकॉल पायदळी तुडवले जात आहेत. लाखोंच्या संख्येनं भक्त या कुंभ मेळ्यात सहभागी होत आहेत.
थर्मल स्क्रीनिंगच्या व्यवस्थेचा फज्जा उडाल्याचं दिसलं. सीसीटीव्ही लावले असतानाही भाविकांकडून मास्क घालण्याकडे दुर्लक्ष झालं आहे.कुंभ मेळा पोलिस नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी झालेल्या दुसऱ्या शाही स्नानात 31 लाखांहून अधिक भक्तांनी भाग घेतला होता.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारीरी 11 .30 वाजल्यापासून ते सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत 18 हजार 169 भक्तांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यापैकी 102 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी असा दावा केला की, शाही स्नानावेळी राज्य सरकारने केंद्राकडून जारी केलेल्या कोरोना गाइडलाइन्सचं पालन केलं.