प्रसिद्ध भजन सम्राट अनुप जलोटा साई बाबांच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला

9

प्रसिद्ध भजन सम्राट नेहमी चर्चेत असणारे अनुप जलोटा आता अभिनय क्षेत्रातही आपली कामगिरी दाखवणार आहेत. सत्य साईबाबांच्या बायोपिकमध्ये सत्य साईबाबांच्या रोलमध्ये अनुप जलोटा पडद्यावर झळकणार आहेत. बिग बॉसच्या 12 व्या सीझनमध्ये गायक अनुप जलोटा आणि अभिनेत्री जसलीन मथारू यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा दावा करण्यात आला होता. या दोघांनी बिगबॉसच्या घरात एकमेकांकडे आकर्षित झाल्याचे दाखवले होते आणि नंतर दोघांचा ब्रेकअप झाल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या.

अनुप जलोटा यांनी सांगितले की, सत्य साईबाबांना आपण 55 वर्षांपूर्वी आपल्या वडिलांबरोबर भेटलो होतो. त्यावेळी आम्ही तेथे भजनही गायले होते. आता इतक्‍या वर्षांनंतर मला सत्य साईबाबांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. त्याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो. सत्य साईबाबांच्या बायोपिकचे अजूनही नाव निश्‍चित झालेले नाही. विकी राणावत या सिनेमाचे डायरेक्‍शन करणार आहेत. जॅकी श्रॉफ, साधिका रंधावा, गोविंद नामदेव, अरुण बक्षी आणि मुश्‍ताक खान या चित्रपटात अनुप जलोटा यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहेत. सत्यसाई बाबांवरील बायोपिक पुढच्या वर्षी 22 जानेवारीला रिलीज होणार आहे असेही त्यांनी सांगितले आहे.