प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भावाचे कोरोनाने निधन; बंगालात कडक लॉकडाऊनचा निर्णय

16

पश्चिम बंगालच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे लहान भाऊ असीम बंदोपाध्याय यांचं शनिवारी सकाळी कोरोनामुळे निधन झालं. सर्व नियम पाळून त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

कोलकात्यातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.  मात्र, आता त्यांची प्राणज्योत मालवली आहे. महिनाभरापासून कोरोना रोगाने ते संक्रमित होते. उपचारादरम्यान आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला आहे.

पश्चिम बंगाल मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी १५ दिवसांचा कडक लॉकडाऊनची घोषणा केलीय.

पत्रकार परिषदेत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आम्ही कोरोनाचा ससंर्ग कमी करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. तसंच राज्यात वैद्यकीय सुविधा पुरवण्याचाही प्रयत्न केला. पश्चिम बंगालमध्ये बेड्सची संख्या वाढवून ती 30 हजारापर्यंत वाढवण्यात आली आहे.