पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी व तृणमूल काँग्रेस यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रुत आहे. पश्चिम बंगालमधील होऊ घातलेल्या निवडणुकीमुळे या दोन्ही उभय पक्षांत मोठा संघर्ष पाहायला मिळतो आहे. बंगालच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेस व सीएएममधील ११ आमदारांनी व एका माजी खासदाराने भाजपात जाहीर प्रवेश केला आहे.
तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वाममता बॅनर्जी यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे शुभेंदू अधिकारी यांच्यासह 11 आमदार आणि एका माजी खासदाराने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यात तृणमूल, काँग्रेस आणि काही डाव्या पक्षांच्या आमदारांचाही समावेश आहे.
अधिकारी यांच्यासोबत तृणमूलच्या काही आजी-माजी आमदारांनीही पक्षात प्रवेश केला आहे. अधिकारी यांचा भाजप प्रवेश हा बंगालामध्ये तृणमूलला मोठा हादरा मानला जातोय. येणाऱ्या काळातील विधानसभा निवडणुकीत याचा मोठा फटका तृणमूल काँग्रेसला बसेल असा अंदाज वर्तवला जात आहे.