फेसबुक आणि व्हॉट्सअपवरील ग्रुपच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाणीवपूर्वक बदनामी करणाऱ्या १३ जणांविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
घटनात्मक पदावर असलेल्या या सन्माननीय व्यक्तींचे चारित्र्यहनन करणारे आक्षेपार्ह फोटो विविध समाजमाध्यमांवर टाकण्यात आल्याची तक्रार पुणे सायबर पोलिसांकडे नोंदवण्यात आली होती. आकाश चंद्रकांत शिंदे या तरुणाने याबद्दल तक्रार दाखल केली होती.
त्यावरुन पोलिसांनी भादवि कलम 469, 499, 500, 504, 505 (2), 34 सह माहिती तंत्रज्ञान कायदा 67 नुसार गुन्हे दाखल केले आहेत. फेसबुकवरील ‘राजकारण महाराष्ट्राचे’, ‘कोमट बॉइज अॅण्ड गर्ल्स’, ‘CM Devendra Fadanvis Fan Club’ आणि व्हॉट्सअपवरील ‘इंटलेक्युअल फोरम’ या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये बदनामीकारक मजकूर प्रसारित केला जायचा. या तक्रारीनंतर सायबर विभाग या प्रकरणाचा तपास करत आहे.