काँग्रेसच्या पक्षांतर्गत राजकारणामुळे बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, या सर्व चर्चाना आता खुद्द बाळासाहेब थोरात यांनी पूर्णविराम दिला आहे. बाळासाबेत थोरात यांनी सोमवारी दिल्लीत जाऊन ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेत नाराजी जाहीर केल्याचंही बोललं जात असताना थोरात यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे.
माझ्याकडे प्रदेशाध्यक्ष, विधीमंडळ नेता आणि महसूल मंत्री या जबाबदाऱ्या असून दिल्लीत जाऊन योग्य प्रकारे त्या सांभाळेन असे सांगितले होते. पण तुम्हाला अजून काही जबाबदारी द्यायची असेल तर माझी हरकत नाही असे त्यांनी सांगितले होते.दिल्लीतील नेत्यांसोबत राजीनाम्याची चर्चा झाली का? या प्रश्नावर ते म्हणाले की, ‘दिल्लीत जाऊन मी राजीनाम्याची चर्चा करण्याची काहीच गरज नव्हती. एकाच व्यक्तीकडे इतक्या जबाबदाऱ्या आहेत, त्यामध्ये इतरांना जबाबदारी वाटून द्यावी अशी भूमिका कोणी मांडत असेल तर त्यात काही चुकीचं नाही. त्यातच यासंबंधी प्रक्रिया सुरु झाली असेल तर मी स्वागत करतो. मी समाधानी, आंनंदी आहे. मला काही अडचण नाही’.
राजीनामा दिल्यास प्रदेशाध्यक्षपदी कोणाची निवड व्हावी असे विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, ‘मी कोणाचं नाव पुढे करणार नाही. निर्णय घेताना एकच अपेक्षा असेल की तरुण, धडाडी, काँग्रेसला पुढे नेईल आणि राज्यभर फिरेल अशा कोणत्याही योग्य व्यक्तीला संधी दिली जावी’.एका वृत्तवाहिनीशी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी, ‘मी दिल्लीत गेलो त्याचा आणि राजीनाम्याचा काही संबंध नाही.