नविन कृषी कायद्यांविरोधात वाशिम कॉंग्रेसचे ऊपोषन

9

मागील चार महिन्यांपासून दिल्ली सिमेवर नविन कृषी कायद्यांविरोधात शेतकर्‍यांकडून आंदोलन केले जात आहे. कॉंग्रेसने या आंदोलनास पाठीबा दिला आहे. महाराष्ट्रा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या कायद्यांचा ऊल्लेख “शेतकर्‍यांसाठीचे काळे कायदे” असा करीत नविन कृषी कायद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमिवरच वाशिम कॉंग्रेसने नविन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ एकदिवसीय लाक्षणिक ऊपोषन केले आहे.

नविन कृषी कायदे हे शेतकर्‍यांसाठी अहिताचे आहेत, असे मत व्यक्त करीत वाशिम कॉंग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष एड. दिलीप सरनाईक यांच्या नेतृत्वात हे ऊपोषन करण्यात आले. यावेळी नविन कृषी कायद्यांसोबत दिवसेंदिवस वाढणार्‍या महागाईवरसुद्धा बोट ठेवण्यात आले.

अगोदरच कोरोना आणि कोरोनासंबंद्धित निर्बंधांमुळे सामान्य माणुस मेटाकुटीला आला आहे. त्यामध्येच वाढती महागाई हासुद्धा सर्वसामान्यांना भेडसावणारा महत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे वाढत्या महगाईचासुद्धा यावेळी निषेध नोंदवण्यात आला.

यावेळी कॉंग्रेसचे वाशिम जिल्हा प्रवक्ते दिलीप भोजराज, कॉंग्रेस सेवादलचे वाशिम जिल्हाध्यक्ष डॉ. विशाल सोमटकर, जि.प. अध्यक्ष डॉ. श्याम गाभने, प्रकाश राठोड, ईफ्तेकार पटेल, राजाभाऊ चौधरी ई. सह मोठ्यासंख्येने कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते ऊपस्थित होते.