त्यामुळे पृथ्वीला सहज सोडणे सोपे जाणार नाही : डॉ.मंगला नारळीकर

8

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच संस्थांनी कार्यक्रमांचे व्हर्च्युअल आयोजन केले होते. ऑनलाइन पार पडलेला हा विज्ञानोत्सवात जगभरातील नागरिक सहभागी झाल्याने तो खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचला.

सजीवांना जगण्यासाठी पृथ्वीसारखे वातावरण आणि संसाधने दुसऱ्या ग्रहावर मिळणे सध्या तरी अवघड आहे. त्यामुळे पृथ्वीला सहज सोडणे सोपे जाणार नाही. आपण मंगळावर गेलो तरी श्वासातून बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईडचे ऑक्सिजनमध्ये कोण रूपांतर करणार? त्यामुळे मी तरी मंगळावर जाणार नाही, असे उत्तर शास्त्रज्ञ डॉ. मंगळा नारळीकर यांनी दिले.

सध्या तरी मानवी वस्तीसाठी पृथ्वी इतका योग्य दुसरा ग्रह नाही. जर तुमचे काही आर्थिक हितसंबंध असतील किंवा काही संसाधने मिळवायची असतील तर दुसऱ्या ग्रहावर वस्ती करण्यास जाऊ शकतो, असे डॉ. जयंत नारळीकर यांनी सांगितले.

उच्च प्राथमिक वर्षापासूनच निश्चितच खगोलशास्त्र शिकवले जावे, असे मत डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केले. हे शिकवत असताना विद्यार्थ्यांना पुस्तक आणि गणिताचा सुरवातीपासूनच आग्रह धरू नये, असे मत डॉ. मंगला नारळीकर यांनी व्यक्त केले.

‘आयुका’च्यावतीने ‘शास्त्रज्ञांशी थेट संवाद’ या ऑनलाइन कार्यक्रमात डोंबिवली येथील अपूर्व वैद्य याने ‘दुसऱ्या ग्रहावर मानवी वस्ती होईल का?’ या आशयाचा प्रश्न विचारला होता. त्यावेळी डॉ. मंगला नारळीकर यांनी हे उत्तर दिले.