अचानक पंचवीस दिवसांचा लॉकडाऊन लादणे आम्हाला मान्य नाही

12

लासूर स्टेशन (ता.गंगापूर) या जिल्ह्यातील मोठ्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी पोलिस चौकीत धाव घेत पोलिस निरीक्षकांना निवेदन देऊन शासनापर्यंत आमच्या भावना पोचवण्याचे आवाहन केले.

सकाळपासून शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या ताळेबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी बाजारपेठेत फिरून व्यापाऱ्यांना आवाहन केले होते.

नव्याने जाहीर केलेल्या निर्बंधांनुसार बाजारपेठ पूर्ण बंद न करता सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत दुकाने उघडू द्यावी किंवा एक दिवसआड दुकान उघडणे असे काही निर्बंध लावून व्यवसायास परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली.