‘आपल्याला फार काळ विरोधी पक्षात राहायचं नाही’; फडणविसांचे इरादे स्पष्ट

14

भाजप नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या ‘वर्षभराचा लेखाजोखा’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रम काल पार पडला. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार आशिष शेलार तसेच भाजपचे दिग्गज नेते आणि दादा महाराज मोरे उपस्थित होते.

यावेळी भाषणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. विधानसभा २०१९ निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीला बहुमत मिळून सुद्धा, शिवसेनेनं भाजपची साथ सोडली आणि काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत घेऊन सत्तेची स्थापना केली. असे ते म्हणाले.

महाविकास आघाडीचे सरकार जास्त काळ टिकणार नाही असं म्हणत, आम्हाला हे सरकार पाडण्याची गजर नाही तर ते स्वतः पायात पाय अडकून पडतील असं विधान करत फडणवीसांनी पुन्हा एकदा सत्ता स्थापनेचे संकेत दिलेत.

‘आपल्याला फारकाळ विरोधी पक्षात राहायचं नाही. फक्त जोपर्यंत विरोधी पक्षामध्ये आहात तोपर्यंत विरोधकांची भूमिका निभावत राहू’ असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केल्यामुळे पुन्हा भाजप सत्तेत येईल या विधानाला बळकटी मिळाली आहे.