केंद्राकडून लसीचे डोस कमी मिळाले, प्रत्यक्षात 23 लाख लसींची डोस शिल्लक होते. लसींचा काळाबाजार झाला अनेक डोस वाया गेले.कोरोनाची परिस्थिती आता सरकारच्या नियंत्रणाच्या बाहेर गेली आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता सोपा मार्ग निवडला आहे.
पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना आ. चंद्रकांत पाटील म्हणाले, खरंतर या परिस्थितीत राजकारण करणे चुकीचे असून सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.
व्यवस्था काहीच करायची नाही आणि केंद्र सरकारकडे सगळे ढकलायचं अशा पद्धतीचे राजकारण सुरू असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली.
तसेच प्रत्यक्षात मात्र मुख्यमंत्र्यांची दोन वेळा फोनवरून पंतप्रधानांशी चर्चा झाली. त्यानुसार त्यांनी ऑक्सिजन व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकार केवळ खोटे बोलण्याचे काम करीत आहे, अशी टीका पाटील यांनी केली.