नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला सर्वाधिक यश मिळालं असल्याचं दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांत केला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपल्याला सर्वाधिक यश मिळाल्याचा दावा केला आहे. राज्यातील १४,२३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या, यामध्ये जवळपास सर्वच प्रस्थापित नेत्यांनी आपापले गड कायम राखले.
भाजपला सहा हजार जागा मिळाल्याचा दावा चंद्रकांत पाटलांनी केलाय, तर काँग्रेसला चार हजार जागा मिळाल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीला राज्यात सर्वाधिक जागा मिळाल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. त्यामुळे नक्की कुणाला सर्वाधिक यश मिळालं हे समजणं कठीण झालं आहे.
अन्य पक्षांनी कितीही मोठमोठे दावे केले
तरीही भाजप हा राज्यातील सर्वाधिक
जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे. पश्चिम
महाराष्ट्रात भाजपने मोठे यश मिळवले.
- चंद्रकांत पाटील ( प्रदेशाध्यक्ष भाजपा )