उगाच दारूबंदीचा आव आणू नये : विजय वडेट्टीवार

11

चंद्रपुरात गुन्हेगारी वाढल्यामुळे दारूबंदी उठविल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. काहींनी या निर्णयाचे स्वागत केले, तर काही सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली.

कोणाचा नवरा आणि कोणाचा मुलगा दारू पितो हे मला माहित आहे. फुकट समाजसेवेचा बुरखा बांधून टीका करू नये. उगाच दारूबंदीचा आव आणू नये, असा अप्रत्यक्ष टोला मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लगावला.

राज्य सरकारने दारूबंदीचा सर्वकष विचारविनिमय, अभ्यास करून शासनास शिफारस प्राप्त करण्यासाठी सेवानिवृत्त प्रधान सचिव रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती.

दारूबंदीमुळे अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली आहे. अनेकांचा डुप्लिकेट दारू प्यायल्याने मृत्यू झाला आणि जे दारूबंदीचं समर्थन करणाऱ्यांनी आधी आपलं घर बघावं. विरोधकांनी केलेल्या टिकेवर आज विजय वडेट्टीवारांनी उत्तर दिले आहे.