आपल्याला ब्रँड इंडियाला क्वालिटी आणि क्वान्टिटी अशा दोन्ही पातळ्यांवर विश्वासपात्र ठरवायचं आहे:नरेंद्र मोदी

21

नव्या वर्षात देशाला 2 मेड इन इंडिया कोरोना लसी मिळाल्या आहेत. त्यासाठी वैज्ञानिकांचं अभिनंदन करतो, असं सांगत या वैज्ञानिकांवर आपल्याला अभिमान असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. कोरोना संकटाच्या काळातील या वैज्ञानिकांचं योगदान कायमस्वरुपी लक्षात राहील असंही मोदींनी म्हटलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नॅशनल मेट्रोलॉजिकल कॉन्क्लेव्हचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.

आपल्याला ब्रँड इंडियाला क्वालिटी आणि क्वान्टिटी अशा दोन्ही पातळ्यांवर विश्वासपात्र ठरवायचं आहे. भारतीय वस्तू खरेदी करणाऱ्या प्रत्येकाचं मन आपल्याला जिंकायचं आहे.आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी हे गरजेचं आहे. आपल्याला फक्त भारतीय उत्पादनांनी जग भरायचं नाही, तर जगभरातील ग्राहकांच्या विश्वासाला आपल्याला पात्र ठरायचं आहे. असं मोदी यावेळी म्हणाले.

मेड इन इंडियाची ग्लोबल डिमांड, ग्लोबप स्वीकारार्हता या दिशेनं आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. आपल्या देशात सरकारी सेक्टर असो की खासगी सेक्टरमधील सर्व्हिस क्वालिटी चांगली असायला हवी. आपलं क्वालिटी स्टँडर्ड जगभरात भारत आणि भारताच्या उत्पादनाची ताकद वाढवण्यासाठी गरजेचं आहे, असंही मोदी यांनी सांगितलं.