गोळप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या अधिकृत पॅनेलविरोधात सेनेचे पंचायत समितीचे माजी सभापती मंगेश साळवी यांनी स्वत:चे पॅनेल उभे केले आहे.त्यावेळी आम्ही सुसंस्कारित आहोत पण जशास तसे उत्तर देण्याची ताकद माझ्या तरुण कार्यकर्त्यांमध्ये आहे. अंगावर आले तर शिंगावर घेऊन, असा इशारा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे .
ग्रामपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर काल सभा झाली.त्यावेळी उद्योजक अण्णा सामंत, नगराध्यक्ष तथा तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी, ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य उदय बने, नंदकुमार मुरकर, विठ्ठल पावसकर, तालुका युवा अधिकारी तुषार साळवी, शहरप्रमुख बिपिन बंदरकर, राकेश साळवी, बावा चव्हाण यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी सभापती मंगेश साळवी यांची स्वत:च्या अस्तित्वासाठी गोळप गावात लढाई सुरू आहे. ग्रामपंयायतीमध्ये एवढं काय असतं, त्यांनाच माहित पण आम्ही संस्कारक्षम आहोत.या निवडणुकीत शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांच्या सोबतच गाव राहील, याची खात्री आहे. याआधी माझा शिवसैनिक साळवींच्या मागे उभा राहिला. त्याच्यासाठी त्याग केला. तेच बंडखोरी करत असतील तर त्यांची मक्तेदारी नक्की मोडीत काढू.असे उदय सामंत म्हणाले