बिहार विधानसभेत आम्ही २० ते २२ जागा जिंकू : प्रकाश आंबेडकर

3

बिहार विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर १० नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. विविध संस्थांनी केलेल्या चाचण्यांचे एक्झिट पोल जाहीर होत आहेत. एक्झिट पोलनुसार राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्या महागठबंधनकडे बिहारच्या जनतेने सत्ता दिल्याचं दिसून येत आहे. बिहार विधानसभेत २४३ जागा आहे. १२२ जागा मिळाल्या तर बहुमत मिळणार आहे. तेजस्वी यादव यांच्या पक्षाला बहुमत मिळणे शक्य आहे. जवळपास सगळ्याच एक्झिट पोलमध्ये महागठबंधनला १२० च्या वर जागा मिळतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही 20 ते 22 जागा जिंकू असा दावा वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ‘आमच्या प्रोग्रेसिव्ह डेमोक्रेटिक अलायन्सने विकासाला केंद्रबिंदू मानून प्रचारात वास्तव मुद्द्यांवर भर दिला. आमच्यामुळेच बिहारची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आली, असं सांगताना बिहारमध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. बिहार विधानसभेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल’, असं भाकितही प्रकाश आंबेडरांनी केलं आहे.