राज्य सरकारच्यावतीने काही दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिकेत 23 गावांच्या समावेश केला. 2022 च्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत राष्ट्रवादीने जय्यत तयारी चालवली आहे. तर, सत्ताधारी भाजप मात्र गावांच्या समावेशाआधी विकासनिधी देण्याची मागणी करत नाराजी दर्शवली होती.
जनता आमच्या सोबत आहे. त्यामुळे आमच्या विरुद्ध तीन तीन पैलवान एकत्र आले, तरी आम्हीच पुण्याची महापालिका जिंकू याबद्दल माझ्या मनात शंका नाही, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. काल पुण्यात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
केंद्र सरकारच्या तिन्ही कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. सोबतच एक समितीही स्थापन करण्यात आली आहे. निवडणूक आयोग, हायकोर्ट, ईडी, सुप्रीम कोर्ट या सर्व संविधानिक व्यवस्था आहे. हे केंद्र सरकारने आणि एकूणच भाजपने मान्य केले आहे. त्यामुळे मी त्यावर भाष्य करणं योग्य नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.