महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येतील वाढ कायम आहे. दुसर्यांदा महाराष्ट्र हॉटस्पॉट ठरला आहे. कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी ३० एप्रीलपर्यंत वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मात्र परिस्थिती गंभीर होते आहे. अशावेळी वीकेंड लॉकडाऊऐवजी राज्य सरकार तीन आठवड्यांचा कडक लाकडाऊन लावण्याच्या विचाराधीन आहे.
मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये लॉकडाऊन लावण्यासंबंद्धिचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वीकेंड लॉकडाऊनचा काहीही परिणाम होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊनच संसर्ग रोखण्यावर ऊपाय ठरु शकतो असे मत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मांडले आहे.
राज्यातील परिस्थिती गंभीर झाली आहे. वीकेंड लॉकडाऊनचा संसर्ग कमी होण्यावर कुठलाच परिणाम होतांना दिसत नाहीये. आरोग्य यंत्रणेवरसुद्धा वाढत्या रुग्णसंख्येचा ताण येतो आहे. अशावेळी कडक लॉकडाऊनची गरज भासते आहे.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी बैठकीअगोदर लॉकडाऊनबाबत भूमिका घेतली आहे. लॉकडाऊनमुळे छोट्या व्यापार्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने अगोदर छोट्या व्यापार्यांना मदत करावी आणि त्यसनंतरच निर्णय घ्यावा असे त्यांनी सांगीतले आहे.