भारतीय संघानं दुसऱ्या कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियावर ८ विकेट राखून विजय मिळवताना मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवली. विराट कोहली, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, रोहित शर्मा यांच्या अनुपस्थित अजिंक्य रहाणेनं ज्या कौशल्यानं नेतृत्व केलं, त्याचं सारेच कौतुक करत आहेत.
पदार्पणवीर मोहम्मद सिराजला प्रोत्साहन देत राहत अजिंक्यनं त्याच्याकडून चांगली कामगिरी करून घेतली. शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनीही रहाणेसह टीम इंडियाचे कौतूक केले आहे.वेल डन अजिंक्य. तमाम महाराष्ट्राला आणि पुर्ण देशाला आपला खुपखुप अभिमान आहे. टीम इंडियाचं अभिनंदन”, या आशयाचं ट्विट उर्मिला यांनी केले आहे.
भारतान दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. सेटबॅकचं उत्तर कमबॅकनं देणार, मी बोललो होतो… दिलं, तेही त्यांच्या घरी घुसून. अभिनंदन टीम इंडिया.”टीम इंडियाच्या विजयानंतर बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनींही आनंद व्यक्त केला.महान फलंदाज सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांनी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. तेंडुलकर म्हणाला,”विराट कोहली, रोहित शर्मा, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांच्याशिवाय विजय मिळवला, म्हणजे हे खूप मोठं यश आहे. ०-१ अशा पिछाडीनंतर टीम इंडियानं दाखवलेल्या लढाऊ वृत्तीचे कौतुक.”