अनलॉकच्या निर्णयावरुन झालेल्या गोंधळावर काय म्हणाले अजित पवार?

33

कोरोनाची दुसरी लाट आता अोसरत असल्याचे चित्र आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रग्णसंख्येत घट होते आहे. परिणामी महाराष्ट्र अनलॉक होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असतांना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पाच टप्प्यांमध्ये अनलॉक केले जाणार असल्याचा निर्णय जाहीर केला. मात्र यावर मुख्यमंत्री कार्यालयानेच निर्णय अजून झाला नसून विचाराधीन असपंयाचे स्पष्टीकरण दिले.

यानंतर राज्याभरात चांगलाच गोंधळ ऊडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. विरोधकांनी हा मुद्दा ऊचलून धरल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी यावर स्पष्टीकरणसुद्दा दिले. मात्र विरोधकांची टीका अद्यापही सुरुच आहे. या पार्श्वभूमिवरच आज ऊपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वक्तव्य केले आहे.

सरकारमध्ये निर्णयांबाबत पूर्णत: सुसंवाद आहे. कोरोनाच्या आला त्या पहिल्या दिवसापासून ऊद्धव ठाकरे विविध माध्यमांद्वारे जनतेशी संवाद साधत आहे. मुख्यमंत्री या नात्याने तेच अंतिम निर्णत घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे हे भूमिका मांडत असतात. विजय वडेट्टीवार यांनी झालेल्या गैरसमजाबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. वारंवार त्या गोष्टी ऊगाळून काही अर्थ नाही.

सरकार कुणाचही असलं तरि अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील असेसुद्धा त्यांनी यावेळी सांगीतले. रायगड येथे पत्रकारपरिषदेत अजितदादा बोलत होते.