काय आहे खा. मोहन डेलकर यांच्या १४ पानी सुसाईड नोटमध्ये?

19

दादरा नगर हवेली येथील खासदार मोहन डेलकर यांनी मुंबई येथे आत्महत्या केली आहे. एका खासदाराच्या आत्महत्येने राजकीय वर्तुळात धक्काच बसल्याचे वातावरण आहे. मोहन डेलकर यांनी आत्महत्येपुर्वी सुसाईड नोट लिहीली आहे. मुंबई पोलिसांनी ही सुसाईड नोट ताब्यात घेतली असून चौकशीस सुरुवात केली आहे.

मुंबई पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे डेलकर यांनी त्यांच्याच लेटरपॅडवर तब्बल १४ पानांची सुसाईड नोट लिहीली आहे. या नोटवर गुजराती भाषेत सुसाईड नोट असे हेडींग देण्यात आले आहे. यामध्ये डेलकर यांनी काही प्रशासकीय अधिकारी तसेच काही राजकीय व्यक्तींचासुद्धा ऊल्लेख केला असल्याचे सांगीतले जात आहे. सुसाईड नोटमध्ये ते नैराश्यात असल्याचे स्पष्ट होते. नैराश्यात असण्याचे कारण त्यांनी नोटमध्ये सविस्तर नमुद केले आहे. यामध्ये काही अधिकारी नेहमिच माझा अपमान करत होते. असे त्यांनी म्हटले आहे.

मोहन डेलकर यांनी मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसराती सी ग्रीन साऊथ या हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी (दि.२२ फेबृ) दुपारी ते हॉटेलमधील त्यांच्या खोलीत मृतावस्थेत आढळले होते. प्राथमिक शवविच्छेदनाच्या अहवालानुसार त्यांनी अात्महत्याच केल्याचे निष्पन्न झाले आहे. मोहन डेलकर यांचे कुटुंबीय तसेच त्यांचे सहकारी, कामावर असलेले नोकरदार यांचा जवाब घेतला जणारा असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगीतले.

मोहन डेलकर हे सातवेळा लोकसभेचे खासदार राहिले आहे. दादरा नगर हवेली या केंद्रशासीत प्रदेशातून ते येतात. डेलकर य‍ांचा राजकीय प्रवास हा कॉंग्रेसपासून सुरु झाला. त्यानंतर काही काळा ते भाजपमध्येसुद्धा होते. अलिकडे मोहन डेलकर यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला होता. भारतीय नवशक्ती असे या पार्टीचे नाव आहे.