अर्थसंकल्पावर काय म्हणाले पार्थ पवार?

6

सोमवारी महाविकासआघाडी सरकारने दुसरा अर्थसंकल्प सादर केला. ऊपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सभागृहात अर्थसंकल्प महाराष्ट्रासमोर ठेवला. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे. विरोधकांनी अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली आहे. तर महाविकासआघाडी सरकारमधील नेते अर्थसंकल्पाचे कौतुक करत आहे. या पार्श्वभूमिवरच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते तसेच अजित पवार यांवे चिरंजीव पार्थ पवार यांनीसुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.

पार्थ पवार हे त्यांच्या स्पष्ट बोलण्यामुळे चर्चेत असतात. त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियेची दखल सगळ्यांनी घेणे हे आश्चर्याचे नाही. “सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना नक्कीच लाभ होईल अशाच तरतुदी करण्यात आल्या आहेत. कोरोना महामारीमुळे बजेटवर मोठा परिणाम झाला आहे. मात्र तरिसुद्धा सगळ्याच बाबींच्या मुल्यांचा विचार बजेटमध्ये केला गेला आहे. ही ऊल्लेखनीय बाब आहे. नक्कीच या अर्थसंकल्पाचा सर्वसामान्यांना फायदा होईल” अशी प्रतिक्रिया पार्थ पवार यांनी दिली आहे.

महाविकासआघाडी सरकारमधील नेते अर्थसंकल्पावर स्तुतीसुमने ऊधळत आहेत. भाजपमधून मात्रा नाराजीचा सुर ऊमटत आहे. काही तज्ज्ञांच्या मते अर्थसंकल्प समाधानकारक असल्याचे म्हटले जाते आहे. कोरोनामुळे अर्थसंकल्पातून विशेष आशा करण्यासारखे मुळात काही नव्हतेच त्यातल्यात्यात काही आरोग्य, पायाभुत सुविधा आणि महिलाकेंद्रित तरतूदी या ऊल्लेखनीय आहेत.

कोरोनामुळे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. परिणामी १० हजार २२६ कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पातून मद्यावरील कर वाढवण्यात आला असल्यामुळे मद्य सोडत‍ अन्य गोष्टींवर काहीही परिणाम होणार नाही. मद्याची किंमत मात्र वाढणार आहे.